13 August 2020

News Flash

नांदगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट असल्याच्या पाश्र्वभूमीवर टंचाईचे चटके बसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात

तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट असल्याच्या पाश्र्वभूमीवर टंचाईचे चटके बसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात असून मागील वर्षीचे गारपीट अनुदानही मिळाले नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे तहसीलदारांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देवीदास देवरे, विशाल वडघुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नंतर तहसीलदारांच्या दालनात प्रवेश करीत उपस्थित असलेल्या येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तहसीलदार अनिल गवांदे यांचे लक्ष वेधले. उपविभागीय अधिकारी माळी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी अप्पा झाल्टे, सुनील आहेर, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 12:06 am

Web Title: swabhimani shetkari sanghatana agitation in nandgaon
टॅग Raju Shetti
Next Stories
1 आदिवासी विकास प्रकल्प खात्यातील लिपिकाला लाच घेताना अटक
2 सांगलीत राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा
3 कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या- राजू शेट्टी
Just Now!
X