News Flash

“तळी उचलणाऱ्या एका संपादकाला…” अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरुन राजू शेट्टी संतापले

एका कुटुंबाचं दुख: दिसत नाही पण....

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकार जोरदार टीका केली जात आहे. राज्यापासून ते केंद्रातील नेत्यांपर्यंत सर्वांनीच राज्य सरकारवर निशाणा साधत आणीबाणीची आठवण झाल्याचं म्हटलं आहे. यासोबत हा पत्रकारितेतील काळा दिवस असल्याचा उल्लेख करत आंदोलनंही करण्यात आली. दरम्यान शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन टीका करणाऱ्या भाजपाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“त्यांना त्यांची तळी उचलणाऱ्या एका संपादकाला वाचवायचं आहे. पण हे करत असताना एका महिलेच्या पती आणि सासूने आत्महत्या केली असून कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे हे विसरता कामा नये. एका कुटुंबाचं दुख: दिसत नाही पण संपादकांचं दुख दिसतं. जर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून कुटुंब आत्महत्या करत असेल तर तो कितीही मोठा माणूस असला तरी कारवाई झालीच पाहिजे,” असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. भाजपाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णब यांच्या वकिलांकडून तात्काळ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

वास्तुविषारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या सुसाइड नोटमध्ये नाव असणाऱ्या फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक करत कोर्टात हजर केले.

सरकारी पक्षाची पोलिस कस्टडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी सह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केल्याची अर्णब यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:00 pm

Web Title: swabhimani shetkari sanghtna raju shetty on republic tv arnab goswami arrest sgy 87
Next Stories
1 “कलम ३०६, ३०७ नुसार अटक व्यक्तीसाठी भाजपाला निषेध करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार”
2 अवघी शिवसेना इटालियन काँग्रेसच्या मांडीवर खेळतेय; भाजपा नेत्याची टीका
3 अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?; आशिष शेलार यांचा संजय राऊतांवर निशाणा
Just Now!
X