स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रस्तावित श्री गुरू गोविंदसिंगजी अध्यासनासाठी फडणवीस सरकारने केवळ एक कोटींवर बोळवण केल्यानंतर विद्यापीठाला या उपक्रमासाठी पंजाब सरकारकडे हात पसरावे लागले असून त्या अनुषंगाने ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

घुमान (पंजाब) मध्ये झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वारातीम’ विद्यापीठात गुरू गिंवदसिंगजी यांच्या नावाने स्वतंत्र अध्यासन सुरू करण्याची घोषणा उत्स्फूर्तपणे केली होती.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका

मुख्यमंत्र्यांच्याघोषणेनंतर विद्यापीठाने राज्य सरकारकडे अध्यासनाच्या अनुषंगाने ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर शासनाकडून सुधारित प्रस्ताव मागविण्यात आला. तो १४ कोटींचा होता. अनेक महिने कागदी घोडे नाचवल्यानंतर गेल्या मार्च महिन्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरू गोवदसिंगजी अध्यासनासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

शिवराज पाटील चाकूरकर हे पंजाबचे राज्यपाल असताना विद्यापीठाने डी.लिट. बहाल करून त्यांचा गौरव केला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते विद्यापीठात आले असता, प्रस्तावित गुरू गोवदसिंगजी अध्यासनाच्या उभारणीसाठी पंजाब सरकारने अर्थसाहाय्य करावे, अशी विनंती विद्यापीठाने त्यांना केली होती.

घुमानच्या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी गुरू गोवदसिंगजी अध्यासनासाठी ५ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते, असे विद्यापीठाच्या प्रसिद्धिपत्रकात आता नमूद करण्यात आले आहे.

पंजाब भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष (विद्यापीठ प्रसिद्धिपत्रकात ज्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यासन अधिकारी म्हणून केला आहे.) कमल शर्मा गुरुद्वारा दर्शनासाठी येथे आले असता, विद्यापीठातर्फे  गुरू गोवदसिंगजी अध्यासनासाठी ५ कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वित्त व लेखाधिकारी गोवद कतलाकुटे यांनी त्यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. या उपक्रमासाठी पंजाब सरकारकडून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे शर्मा म्हणाल्याचे विद्यापीठाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.