लॉकडाउनमध्ये भरवला भुकेल्यांच्या पोटात घासकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व देश स्थानबद्धतेत आहे. स्वतः घरात राहून रोगप्रसार थांबवायची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकावर आहे. सरकार आणि प्रशासनाकडून गरजूंना सर्वतोपरी मदत सुरू आहे. परंतु संकटच एवढं मोठं आहे की सर्वांपर्यंत मदत पोहोचणे कठीण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी, स्वामी विवेकानंदांच्या ‘सेवा’ तत्वाने प्रेरित होऊन, आपल्या विवेकानंद सेवा मंडळाने (विसेम) खारीचा वाटा उचलला आहे.

परप्रांतीय असल्याने यांच्यापैकी कुणाकडेच रेशन कार्ड नव्हते. देशभरातल्या अशा अनेक स्थलांतरीत असंघटित मजुरांपर्यंत अन्नधान्य आणि किराणाची मदत पोहचविण्यासाठी हंगर हेल्पलाईन चालवण्यात आली. या हेल्पलाईन मार्फत ठाणे, पुणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यातून तसेच गोव्यातून येणाऱ्या मदतीच्या हाकेस धावून जाऊन त्यांस धान्य किराणा व औषधे पोहचविण्याची जबाबदारी विवेकानंद सेवा मंडळाकडे सोपविण्यात आली. हेल्पलाईनच्या या कार्यात साहाय्य करताना, स्थानबद्धतेचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करून मंडळाने त्या गरजू देशबांधवांना मदतीचा हात देऊन कुणीही उपाशी राहणार नाही याची खात्री केली.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि स्थानबद्धतेचे सर्व नियम पाळून, २९ एप्रिलपर्यंत एकूण ५११ देशबांधवांपर्यंत या मदत पोहचविण्यात मंडळास यश आले आहे.