ऑनलाइन आरक्षण, प्रवेश शुल्कात वाढ

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाइन नोंदणी आणि शनिवारी-रविवारच्या प्रवेश शुल्कात उद्या १ फेब्रुवारीपासून वाढ होणार आहे. यामुळे ताडोबाची व्याघ्रभ्रमंती सामान्य व मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली. दरवाढीने पर्यटकच नव्हे तर रिसॉर्ट व पर्यटन केंद्र संचालक, वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, स्थानिकांमध्येही तीव्र स्वरूपाची नाराजी आहे.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

मध्य भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्प अशी ख्याती असलेला ताडोबा देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. बिलाल हबीब यांच्या मते वर्षांकाठी ५०० ते ६०० कोटींचे उत्पन्न देणारा हा व्याघ्र प्रकल्प आहे. ही वस्तुस्थिती असली तरी व्यवस्थापनाने केलेली दरवाढ सामान्य पर्यटकांना ताडोबा व्याघ्र पर्यटनापासून वंचित ठेवणारी आहे. यामुळे वाघ केवळ श्रीमंत, अतिश्रीमंत आणि अतिविशिष्ट पर्यटकांनीच बघावा, असे वन खात्याचे धोरण आहे की काय, अशी शंका मनात येते.

नवी दरवाढ गुरुवारी १ फेब्रुवारीपासून होत आहे. त्यानुसार ६० दिवसांपर्यंत आरक्षणासाठी शनिवार व रविवार वगळता एक हजार रुपये प्रवेश शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारले जाणार आहे. मात्र शनिवार व रविवारी ते दुप्पट म्हणजे दोन हजार असेल. ६० ते १२० दिवसांपूर्वी आरक्षण करून ठेवणाऱ्यांना चार हजार रुपये, तर शनिवार व रविवारी आठ हजार रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. जिप्सीचे २२०० रुपये, गाईड ३५० रुपये, कॅमेऱ्याचे २५० रुपये पर्यटकांना स्वतंत्र द्यावे लागतील. एका जिप्सीत केवळ सहा पर्यटक बसू शकतील. ही दरवाढ बघता सहा जणांच्या कुटुंबाला शनिवारी-रविवारी ताडोबाची सफर करायची असेल तर किमान १५ ते २० हजार रुपये खर्च येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन प्रवेश शुल्कातील वाढ ही कल्पनाच मुंबईतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यातील असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्याच्या आग्रहानंतरच ताडोबा व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव वन खात्याचे प्रधान सचिव व प्रधान मुख्य वन संरक्षकांकडे पाठविला. त्यानंतर याला मंजुरी मिळाली. ही दरवाढ बघता सर्वसामान्यांनी वाघ आणि ताडोबात पर्यटन करायचेच नाही काय, अशी प्रतिक्रिया सतीश निंबाळकर या सामान्य पर्यटक व हॉटेल व्यावसायिकाने व्यक्त केली. ही दरवाढ नाही तर बाजारीकरण आहे, अशी टीका आता पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.

ताडोबा व्यवस्थापन या दरवाढीचे समर्थनही करते. यामुळे बोगस नावाने नोंदणी करून नंतर वेळेवर येणाऱ्या पर्यटकांकडून अवाच्या सवा रुपये वसूल करणाऱ्यांना यामुळे आळा बसेल. पर्यटकांच्या ओळखीचा पुरावा ऑनलाइन नोंदणी करताना सादर करावा लागणार आहे. अन्य जिल्हय़ातील विद्यार्थी, शाळा व सामान्य नागरिकांच्या शनिवार व रविवार वगळता अन्य दिवसांच्या शुल्कात वाढ केलेली नाही. चंद्रपूर जिल्हय़ातील विद्यार्थ्यांसाठी ‘चला माझ्या ताडोबाला’ या मोहिमेलाही कोणतेही शुल्क लागणार नाही. भारतामध्ये ५० ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत. तेथील शुल्काच्या तुलनेत ताडोबाचे शुल्क कमी आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना आता जिप्सी शेअरसुद्धा करता येणार आहे. ताडोबा व्यवस्थापनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रदर्शनासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. या पर्यटन शुल्कातून येणारा निधी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानकडे जमा होतो. प्रवेश शुल्कापोटी मिळणारे एक हजार रुपये शासनाकडे जमा होतात. येथील रिसॉर्ट व पर्यटन केंद्र संचालकांकडून बोगस नावावर नोंदणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानने ऑनलाइन नोंदणी व्यवस्थेमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्र इको टुरिझम या वेबपोर्टलवर आरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे.   – मुकुल त्रिवेदी, क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भरमसाट दरवाढ केल्यामुळे आम्हा सामान्य पर्यटकांना एका व्याघ्रभ्रमंतीसाठी १५ ते २० हजार रुपये खर्च अधिक आहे. ही दरवाढ बघता सामान्यांनी व्याघ्रभ्रमंती करू नये असेच काहीसे वन खात्याच्या मनात तर नाही ना, अशी शंका येते. तेव्हा ही दरवाढ मागे घेण्यात यावी व तात्काळ सामान्य पर्यटकांना ताडोबाची सफर अधिक सोईस्कर होईल अशा पद्धतीने संरचना करावी.    – मेघना रामटेके, सामान्य पर्यटक

ताडोबात ८८ वाघ

ताडोबात आजच्या घडीला ८८ वाघ, बिबटे, रानकुत्रे, चितळ, सांबर, कोल्हा, अस्वल, रानगवा, विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. जंगलभ्रमणासाठी मोहुर्ली, पांगडी, कोलारा, खडसंगी, झरी या सहा प्रवेशद्वारांतून वाहनांना प्रवेश दिला जातो. यातील पांगडी प्रवेशद्वार १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात येत आहे. ही १२५ जिप्सीसाठी नोंदणी ऑनलाइन उपलब्ध आहे. १२ वाहनांचा व्हीआयपी कोटा आहे. त्यात सकाळी ३ व संध्याकाळी ३ व्हीआयपी वाहनांचा कोटा वनमंत्र्यांच्या कार्यालयात व ९ गाडय़ा प्रकल्प संचालक ताडोबा क्षेत्र संचालकांच्या कार्यालयासाठी राखीव आहे.

९ दिवसांत एक कोटीचे उत्पन्न

दरवाढीबाबत नाराजीचे सूर उमटत असले तरी ऑनलाइन नोंदणीतून मात्र वेगळे चित्र निर्माण झाले आहे. वाढीव दरानुसार फेब्रुवारीच्या पुढील काळासाठी नोंदणी जानेवारीपासूनच सुरू झाली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ७ ते १७ जानेवारी २०१८ या दरम्यान झालेल्या नोंदणीतून एक कोटीचे उत्पन्न ताडोबा टायगर कंझव्‍‌र्हेशन फाऊंडेशनच्या खात्यात जमा झाले आहे.