दगडखाणीतून बेकायदा उत्खननप्रकरणी कारवाई करू नये यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विनीत चिरमाडे, रा. सावरगाव यांचा कर्जत तालुक्यात सिंधुस्टोन क्रशर्स या नावाने खाण व्यवसाय आहे. या खाणीतून त्यांनी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर महसूल विभागातर्फे कारवाई करण्यात येणार होती. ही कारवाई नको असेल तर १० लाख रुपये लाचेची मागणी कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांनी चिरमाडे यांच्याकडे केली होती. या संदर्भात चिरमाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली़