News Flash

क्षमता असेल तर त्यांना फिल्मसिटी नेऊ द्या, आम्ही…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

"कलाकृती गावपातळीवर पोहोचवण्यासाठी उभारणार ‘परवडणारी सिनेमागृहे’"

(संग्रहित छायाचित्र)

क्षमता असेल तर त्यांना फिल्मसिटी नेऊ द्या, आम्ही मात्र, दर्जात्मक आणि राज्याच्या निर्मिती सुविधांवर भर देणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला. योगींनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी १००० एकर जागाही उपलब्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुंबईतील फिल्मसिटी युपीला नेण्याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता.

मुख्यमंत्री म्हणाले, “मागील अनेक वर्षात या क्षेत्रातून अनेक कलाकार घडले. याच क्षेत्रामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव-नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱ्या काळात दर्जोन्नती करण्यावर भर असेल.”

‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारणार – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठी चित्रपटांचे शो राखीव ठेवण्याबाबत आग्रही

हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 6:57 pm

Web Title: take mumbai filmcity to up if they have capabilities we will focus on quality production facilities says cm uddhav thackeray aau 85
Next Stories
1 अरण्यऋषींचा ९० वा वाढदिवस साजरा; पक्षी सप्ताहास प्रारंभ
2 “शिवसेना खासदारावर कारवाई करून आम्हालाही नाईक कुटुंबीयाप्रमाणे न्याय द्या”; उद्धव ठाकरेंकडे मागणी
3 दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू
Just Now!
X