तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा शोध

कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे ,अशी माहिती अ‍ॅड. जयंत मुळेकर(खोपोली) यांनी बोलताना दिली .

कोकणात पर्यटन व्यवसाय वाढीस लागत आहे .त्यामुळे दुग्ध ,दुग्धजन्य पदार्थ (उदा. पनीर ,आईस्क्रीम) तसेच अंडी व कोंबडयांची मागणी वाढू लागली आहे. कोकणात पर्यटन हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.या वस्तू अन्य जिल्ह्यातून आयात करण्यात येत आहेत.

कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक घटक नव्हते .त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरत नव्हता.दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा  कोकणात निर्माण होत नव्हता त्यामुळे ज्वारीचा कडबा उसाचे बाड आयात करावे लागत होते .तसेच उन्हाळी दिवसांमध्ये हिरवी वैरण नसल्यामुळे खुराकाचा खर्च अवास्तव होवुन हा व्यवसाय फायदेशीर ठरत नव्हता अशी अ‍ॅड. जयंत मुळेकर यांनी म्हटले आहे .

आता मात्र यामध्ये क्रांतिकारक बदल तामिळनाडूतील कृषी  शास्त्रज्ञांच्या शोधामुळे झाला आहे तामिळनाडूच्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी वैरणीचा फार उत्तम जाती शोधून काढल्या आहेत असे अ‍ॅड. मुळेकर म्हणाले.कोकणातील काही शेतकऱ्यांना आपण प्रायोजिक तत्त्वावर हे वाण लागवडीत दिले .त्याचा अनुभव फार उत्साहवर्धक दिसून आला अशी माहिती  जयंत मुळेकर यांनी  बोलताना दिली.

कोकणातील जमिनीत देशावर व गुजरातमध्ये येणारी बरसीम व लसूण घासही पिकं  तेवढ्या जोमाने वाढत नाहीत. हि उणिव  नवीन वाणामुळे भरून  निघाली आहे असे ते म्हणाले cohfs 29 व cohfs31 हा वैरणीचा वाण बियाणापासून लावता येतो .एवढेच नव्हे तर उसाप्रमाणे त्यांच्या टाटाचे तुकडे  लावूनही म्हणजेच बेने म्हणून वापरून लागवड करता येते एकदा लागवड केली की पहिली कापणी ६५ दिवसांनंतर घेता येते व नंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने घेता येतात. एकदा लागवड केली की सतत पाच वष्रे कापण्या घेता येतात या वाणाचे एक पान जवळजवळ  ५५ इंच लांब असते व खोडावर ही पाने एकमेकास लागून फुटलेली असतात .तसेच गजराज, यशवंत व हत्ती घास यांच्या तुलनेत हा चारा अतिशय मुलायम व पाचक असतो त्यात कॅलशियम आँग्जलेटचे प्रमाण नसते.त्यामुळे वैरण१२ ते १५ टक्के प्रथिनयुक्त असल्यामुळे  अतिशय पौष्टिक आहे ही जात म्हणजे वरदानच आहे असे  एड.जयंत मुळेकर यांनी बोलताना सांगितलं .

बाजरीचे cogs हे वाण सव्वा महिनेस कापणीस तयार होते .तीव्र उन्हाळ्याचे दिवस सोडता इतर वेळी दुधाळ जनावरास देणे फायदेशीर ठरते ,कारण यात प्रथिनांचे प्रमाण १३.९ टक्के आहे. यापासून उत्तम प्रतीचा मुरघास (silage)  करता येते.

co4 व co5 म्हणजेच Hybrid Napier Crass नंबर ४ व  ५ हे गवतांचे वाण उत्पन्नात अतिशय विक्रमी आहे co5 हे गावत हेक्टरी साडेतीनशे ते  साडेचारशे टन एवढं प्रचंड उत्पन्न देते .कोकणातील शेतकर्यानी या क्रांतिकारक शोधांचा फायदा घेऊन आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर करावा .दुग्ध उत्पादनात यामुळे वाढ करून हापूस आंब्याच्या उत्पन्नात पुरक उत्पन्नाची जोड द्यावी असे अ‍ॅड.  जयंत मुळेकर यांनी बोलताना सांगितले.