नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचे विद्रूपीकरण करण्यात आल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्य़ात घडला आहे. हा प्रकार सत्य असेल तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग असल्याचे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून आरोपीला तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड पोलीस ठाण्यांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर वराहाचे तोंड लावून विद्रूपीकरण करण्यात आले होते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत मैंद यांनी उमरखेड पोलिसांत तक्रार दिली. त्या प्रकरणी पोलिसांनी उमरखेडचा रहिवासी गुणवंत सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुणवंतने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. सत्र न्यायालयाने ४ जुलैला जामीन अर्ज फेटाळला. त्याविरुद्ध गुणवंतने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जावर न्या. मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने अर्जदाराची बाजू ऐकली. पण, हा प्रकार सत्य असल्यास एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीची कधीही न यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने अर्जदाराची बाजू ऐकली. पण, हा प्रकार सत्य असल्यास एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे.

त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीची कधीही न भरून निघणारी हानी होते, असे मत व्यक्त करून उच्च न्यायालयाने यवतमाळ पोलिसांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत आरोपीला तात्पुरता जामीन मंजूर केला. तसेच आरोपीला आपला मोबाईल उमरखेड पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले.