सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट तुफान गाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींचे पुत्र रायबा यांना किल्लेदारी दिलेल्या पारगड किल्ल्यावर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. मात्र पर्यटकांकडून शिस्तीचे पालन केले जात नाहीये. दारु पिणे, बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या गडावर व तटांवरून फेकून देणे, जयजयकाराच्या कर्कश्श घोषणा, चित्रविचित्र आवाज काढणे असे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. याचा त्रास गडावर राहत असलेल्या कुटुंबांना तर होतोच आहे शिवाय गडाचे विद्रुपीकरण होत आहे. याप्रकरणी आता खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतली आहे. महाराष्ट्र पर्यटन खात्याच्या प्रधान सचिवांना याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

शनिवारी (१८ जाने.) रोजी काही पर्यटक रात्री १० ते ११ वाजता गडावर हुल्लडबाजी करत होते. त्याची माहिती गावकऱ्यांनी चंदगड पोलीस स्टेशलना दूरध्वनीमार्फत दिली असता, आपल्याकडे वाहनांची व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गडावर येण्याबाबत असमर्थता दर्शवली. अखेर या सर्व अडचणी व पर्यटकांचे गडावरील बेशिस्त वर्तन याबद्दल मनोहर भालेकर यांनी ‘पंतप्रधान कार्यालय’ (PMO) यांच्या वेबसाइटवर तक्रार केली. या तक्रारीची दखल भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. या कार्यालयातून महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याच्या प्रधान सचिवांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

काय आहे पारगड किल्ल्याचा इतिहास?

नरवीर तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वत:च्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीरमरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंचर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले. ३५० वर्षांपासून या गडावर राहत असलेले शिवकालीन मालुसरे वंशज, शिंदे, शेलार, माळवे, भालेकर, नांगरे, चव्हाण इ. अनेक शूर घराण्यांनी प्रतिकूल परिस्थितीतदेखील किल्ल्याचे जतन केले आहे. या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल ११ पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे. पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन १६७६ मध्ये पारगड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हा किल्ला बांधला.