05 August 2020

News Flash

महाराष्ट्रातही ‘तान्हाजी’ होणार टॅक्स फ्री; मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी अजय देवगण अभिनीत तान्हाजी हा चित्रपट करमुक्त केला आहे.

२०२० या नवीन वर्षात कमाईचा २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला.

उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी अजय देवगण अभिनीत तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. मात्र, या चित्रपटाची कथा ज्या वीरयोद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे. तो योद्धा महाराष्ट्राच्या मातीततला शिवरायांचा मावळा असतानाही महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला नव्हता. तो करमुक्त करण्यात यावा अशी मागणीही सातत्याने करण्यात येत होती. याला अनुसरुन राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली होती. त्याचबरोबर इतर अनेक चित्रपट रसिकांनीही अशी मागणी केली होती. त्यामुळे या मागण्यांचा विचार करता बुधवारी झालेल्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करीत आहे. केवळ सहा दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. मराठमोळ्या ओम राऊत यांनी या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेता अजय देवगणने यात तान्हाजी मालुसरे यांच्या प्रमुख व्यक्तीरेखेशिवाय या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. अभिनेत्री काजोलनेही या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी व्यक्तीरेखा साकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 10:12 pm

Web Title: tanhaji movie will be tax free in maharashtra too cm to announce soon aau 85
Next Stories
1 ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
2 आता हरयाणामध्येही ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; महाराष्ट्रात कधी?
3 कपिल शर्माच्या लेकीचा पहिला फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X