23 February 2020

News Flash

तारापूरमध्ये कांदळवनाच्या जागी बांधकाम

तारापूर येथील कांदळवनाच्या जागी ३४ गुंठे क्षेत्रावर या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केले आहे.

 

बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

पालघर : तारापूर येथील कांदळवनाच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी रमण तारापूरवाला आणि जितेंद्र सोहनलाल जैन या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत किनारा नियमन क्षेत्र व कांदळवनाचा ऱ्हास केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारापूर येथील कांदळवनाच्या जागी ३४ गुंठे क्षेत्रावर या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केले आहे. या क्षेत्रात बांधकाम करण्यात प्रतिबंध घातला असतानाही या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आरोपीने अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी हे बांधकाम करत असताना नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणापासून ५० मीटर क्षेत्रापेक्षा जास्त अंतर  ठेवणे अपेक्षित असताना केवळ दहा मीटर अंतर सोडून सुमारे ४० मीटर भागावर मातीचा भराव करून त्यावर बांधकाम केले. त्यामुळे कांदळवनाचा ऱ्हास झालेला आहे.

न्यायालयाने याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. आरोपीने अनधिकृत बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत या दोघांविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

First Published on February 15, 2020 12:11 am

Web Title: tarapur kandalavan construction work akp 94
Next Stories
1 चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला
2 इस्राइली तंत्रज्ञानाने रंगीत कलिंगड, मिरच्यांची शेती
3 रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांना बसण्यासाठी मिळाली खुर्ची
Just Now!
X