08 March 2021

News Flash

तारापूरची ‘हवा’ पालटणार

दिवाळीपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील एका पथकामार्फत साधारण १७५ उद्योगांची तपासणी पूर्ण झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडून १७५ उद्योगांची तपासणी पूर्ण

देशातील प्रदूषणकारी औद्योगिक परिसरांत तारापूर अग्रस्थानी आल्यानंतर येथील उद्योजकांना कठोर तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहेत. दिवाळीपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील एका पथकामार्फत साधारण १७५ उद्योगांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ३७५ उद्योगांच्या तपासणीला नव्याने सुरुवात झाली आहे. तपासणी झालेल्या उद्योगांतील अहवाल प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसांत अशा उद्योगांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

अखिल भारतीय मांगेला समाजाच्या वतीने राष्ट्रीय हरित लवादात दाखल केकेल्या  याचिकेवरील सुनावणीदरम्यान येथील उद्योजकांवर हरित लवादाने ठपका ठेवून  परिसरातील पर्यावरणाला पोहोचलेल्या हानीची भरपाई करण्यासाठी आणि नैसर्गिक व्यवस्थेची नव्याने स्थापना करण्यासाठी दंडात्मक रकमेची आकारणी करण्यात आली आहे.

याशिवाय हरित लवादाच्या निर्देशाप्रमाणे तारापूर येथील उद्योगांतील प्रदूषणाची पातळी तपासण्याचे काम राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोपविण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल या दोन्ही संस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाला कालांतराने सादर करणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने याचिकेबाबत निकाल दिल्यानंतर राज्य प्रदूषण मंडळाच्या सुमारे ३५ सदस्य विशेष पथकाने तारापूर येथील प्रदूषणकारी ५५० उद्योगांची तपासणी हाती घेतली होती. त्यापैकी दिवाळीपूर्वी या पथकाने सुमारे १७५ उद्योगांतील तपासणी पूर्ण केली आहे. उर्वरित उद्योगांची तपासणी या आठवडय़ापासून पुन्हा हाती घेण्यात आली आहे.

तपासणी अशी!

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकांमार्फत उद्योगांना देण्यात आलेल्या उत्पादन करण्याच्या परवानगी (कन्सेंट टू ऑपरेट) मधील तरतुदींची योग्य पद्धतीने पूर्तता केली जात असल्याची तसेच उत्पादनाची क्षमता, सांडपाण्याची मात्रा, उद्योगातील प्रक्रियेनंतर सांडपाण्याचा सुधारलेला दर्जा, पाठवण्यात येणारा घातक घनकचरा, चिमणी (स्टॅक) मधील वायूचे पृथक्करण तसेच वापरले जाणारे पाणी याशिवाय उत्पादन आणि सांडपाणी घनकचरा निर्मिती यांमधील परस्पर ताळमेळीचा अभ्यास केला जात आहे. त्याच बरोबरीने उद्योगातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सांडपाण्याचे नमुने, उद्योग क्षेत्रातील हवेचे नमुने व इतर घटकांच्या नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येत आहेत.

आजवर..

तपासणी झालेल्या उद्योगांमधील सांडपाणी आणि हवेच्या नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे पृथक्करण हाती आल्यानंतर दोषी असलेल्या उद्य्ोगांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई आरंभण्यात येणार असल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य प्रदूषण मंडळाच्या विशेष पथकासह केंद्रीय प्रदूषण मंडळाचे भरारी पथक महिन्यातून किमान एकदा तारापूरचा पाहणी दौरा करत असून या पाहणी दरम्यान प्रदूषण करण्याचा संशय व्यक्त होणाऱ्या उद्योगांची तपासणी करण्यासोबत येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, उघडय़ावर वाहणारे रासायनिक सांडपाणी, उद्योगांतून सोडण्यात येणारे व प्रक्रिया करण्यात येणारे सांडपाणी, झिरो डिस्चार्ज उद्योगांमधील सांडपाण्याची परिस्थिती, फेरवापर व इतर घटकांची तपासणी करण्यात येत आहे.

म्हणून उद्योग बंद

उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रण व्यवस्था अपेक्षित समतेची नसल्यास या तपासणीला सामोरे जाण्याऐवजी अनेक उद्योगांनी अशा तपासणीच्या काळात उत्पादन मर्यादित  ठेवण्याचे वा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली उद्योग बंद ठेवण्याचे पर्याय निवडल्याचेही  दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:07 am

Web Title: tarapur wather change pollution control board akp 94
Next Stories
1 रस्ते कामाच्या भूमिपूजनावरून आमदार-खासदारांमध्ये श्रेयवाद
2 पावसाने हरभरा हिरावला
3 भाजपा आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत -मुनगंटीवार
Just Now!
X