माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा यांच्या निधनामुळे होत असलेल्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आबांच्या पत्नी सुमनताई पाटील या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे नेते अजित पवार यांनी शनिवारी केली.  पाटील या आपला उमदेवारी अर्ज बुधवार, १७ मार्च रोजी दाखल करतील असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
बठकीत पवार म्हणाले की,  सुमनताई पाटील याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. आबांनी सामान्य लोकांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन अन्य राजकीय पक्षांनी उमेदवार न देता अविरोध निवडीसाठी सहकार्य करावे.  या मतदारसंघातील कार्यकत्रे पोरके होणार नाहीत याची काळजी घेत असल्याचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निरोप दिला असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली पक्षाशी असणारी बांधिलकी जोपासावी असे आवाहनही त्यांनी केले.