News Flash

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे तौते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती

आज मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत आढावा घेतली

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २१ मे रोजी दिलं होतं. “करोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल,” असं सांगितलं होतं.

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले होते. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती तेव्हा त्यांच्याकडून देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 5:20 pm

Web Title: tauktae cyclone affected areas will be given the help like given on the time of nisarg cyclone said chief minister uddhav thackrey vsk 98
Next Stories
1 “शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”
2 म्युकरमायकोसिस : महाराष्ट्रातील औषध पुरवठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3 काँग्रेसने मोदी सरकारला डिवचले; लावले ‘अच्छे दिन’चे फलक
Just Now!
X