अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला असून, कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच, करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरलाही तौते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरची पत्रे पडली असून, बरंच नुकसान झालं आहे.

तौत्के चक्रीवादळाची माहिती घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री मागच्या तीन दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे – ना. @nawabmalikncp@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #CycloneTauktae pic.twitter.com/aLc6TNlfPW

दरम्यान, “मुंबईत बीकेसी येथील जम्बो कोविड रुग्णालयात सध्या १९३ रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी ७३ रुग्ण आयसीयूत होते. या सर्व रुग्णांना महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जेणेकरुन त्यांच्या उपचारात खंड पडणार नाही.” अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसेचे नवाब मलिक यांनी दिली आहे.

Tauktae Cyclone: लक्ष ठेवण्यासाठी अजित पवारांचं Work Form मंत्रालय

तसेच, “आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात बसून तौते वादळाच्या परिस्थितीची सगळी माहिती घेत होते. कोकणातील काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.” आणि “तौते चक्रीवादळाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मागच्या तीन दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.” अशी देखील माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली आहे.