News Flash

कल्याणमधील टॅक्सी चालकाचा वाईमध्ये खून

मांढरदेव घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली

संग्रहित छायाचित्र

वाई मांढरदेव रस्त्यावर मांढरदेव गावच्या हद्दीत काळूबाईच्या जाळीलगत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर युवकाचा अज्ञात व्यक्तींनी खून क रून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. संदीप शांताराम कदम (वय ३६, मूळ गाव निघावणी, पो. पालवणी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, हल्ली रा. कल्याण) असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मांढरदेव येथील काळुबाईच्या जाळी लगत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. गावापासून पासून एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. वाई पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस पाटलांनी खबर दिल्यामुळे आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी सर्वत्र कळवल्यानंतर संदीप कदमची पत्नी व नातेवाईकांनी वाई येथे येऊन मृतदेह ओळखला.

सदरचा इसम टॅक्सीचालक असून खासगी भाडं आणि ओला कंपनीचे भाडे घेऊन विविध ठिकाणी जात असतो.  २० डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तो कळंबोली ते कोल्हापूर भाडे घेऊन गेला होता. २१ डिसेंबरला दुपारी त्याचे पत्नीशी बोलणे झाले. त्यावेळी त्याने कोल्हापूर येथे असल्याचे सांगितले. त्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्याचा संपर्क होत होता. परंतु, २२ डिसेंबर पासून त्याचा संपर्क नातेवाईकांना होऊ शकला नाही. त्यामुळे २४ डिसेंबरला कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप कदम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. त्यानंतर नातेवाईकांकडे शोध घेतला तरी ते सापडले नाहीत.

मंगळवार (दि २९) रोजी मांढरदेव गावच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाबाबत पत्नी संजना संदीप कदम यांना कल्याण पोलिसांनी माहिती दिली. यानंतर संजना कदम यांनी दिर व पतीच्या मित्रासोबत वाईला येऊन मृतदेह पहिला असता तो संदीप शांताराम कदम यांचा असल्याचे उघडकीस आले. त्याप्रमाणे वाई पोलीस ठाण्यात त्यांनी अज्ञात व्यक्तींनी पतीचे अपहरण करून अज्ञात हत्याराने व कारणासाठी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मांढरदेव येथील दरीत फेकल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली. त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून तो कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी तपास केला. हवालदार शिवाजी वायदंडे, विजय शिर्के, प्रशांत शिंदे कृष्णराज पवार यांनी मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 7:00 pm

Web Title: taxi driver killed in wai in kalyan scj 81
Next Stories
1 ‘सीरम’च्या पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या; मनसेची मागणी
2 “सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण..”;भाजपाचा सेनेला टोला
3 एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह?
Just Now!
X