News Flash

५० वर्षीय शिक्षकाचे सहावीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, जमावाने बेदम चोप देत गाठलं पोलीस स्टेशन

शाळेतच घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

(संग्रहित छायाचित्र)

उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर पालक आणि संतप्त नागरिकांनी शाळेत जाऊन शिक्षकास बेदम चोप दिला आणि शहर पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली आहे. शाळेतच घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मोहन संपत सुरवसे (५०) असं या शिक्षकाचं नाव आहे. तो सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत मागील काही दिवसांपासून अश्लील चाळे  करून गैरवर्तन करत होता. सोमवारी सकाळी मुलगी घरी रडत आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने शिक्षकाकडून केल्या जात असलेल्या किळसवाण्या प्रकाराची माहिती दिली. मागील अनेक दिवसांपासून मांडीवर घेऊन बसवणे, नको त्या ठिकाणी हात लावणे, अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे असे प्रकार हा शिक्षक करीत असल्याचे मुलीने पालकांना सांगितले. त्यामुळे या शिक्षकाचा किळसवाणा चेहरा सर्वांसमोर आला.

त्यानंतर मुलीचे पालक आणि नागरिकांनी जाब विचारण्यासाठी शाळा गाठली. शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त पालक आणि नागरिकांनी या शिक्षकाला शाळेतच चांगला चोप देऊन पोलीस ठाण्यात झोडपत नेले. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन सुरवसे हा वादग्रस्त शिक्षक असून यापूर्वी याच शाळेत बिल काढण्यासाठी एकाकडून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यास निलंबित करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा कामावर घेण्यात आल्यानंतर त्याचा हा नवा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. स्थानिक वृत्तपत्राचा बातमीदार असल्याचे सांगून तो अनेकांना दमदाटीही करत असल्याच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 4:37 pm

Web Title: teacher beaten over misbehaviour with girl student in osmanabad sgy 87
Next Stories
1 अभिनेते शरद पोंक्षे यांच्या कारवर दगडफेक, काचा फोडून हल्लेखोर पसार
2 “…माझी सटकली तर तुझी वाट लागेल”, अजित पवारांनी भरसभेत भरला दम
3 आई, बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे – अजित पवार
Just Now!
X