News Flash

रायगड चढताना शिवप्रेमी पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सुट्टी असल्याने बुलढाण्यातील चिखली गावातले दहा शिक्षक रायगड पर्यटनासाठी आले होते

संग्रहित छायाचित्र

रायगड किल्ला चढताना दत्तात्रेय परिहार (वय 38, रा. चिखली, जि. बुलढाणा) या शिवप्रेमी पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दत्तात्रेय परिहार हे चिखलीच्या अनुराधा इंग्रजी माध्यमिक शाळेचे उपमुख्याध्यापक होते. त्यांच्यासोबत दहा शिक्षक सोमवार आणि मंगळवार सुट्टी असल्याने रायगड पाहण्यासाठी आले होते. सोमवारी महाड या ठिकाणी मुक्काम करुन ते मंगळवारी सकाळी रायगडकडे निघाले.

सगळेजण पायी चढाई करत होते. त्याचवेळी परिहार यांना दम लागला. तरीही परिहार चालत राहिले. काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परिहार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा धक्का आणखी दोन सहकाऱ्यांनाही सहन झाला नाही. त्यांनाही दवाखान्यात दाखल करावे लागले. परिहार यांच्या मृत्यूची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:42 pm

Web Title: teacher died because of heart attack while trekking raigad fort
Next Stories
1 गणपतीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी, अकोल्यात तणाव
2 मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबाबत शंका – शरद पवार
3 हुडहुडी : राज्यात तीन दिवस थंडीची लाट
Just Now!
X