नवीन पनवेल येथील खासगी क्लासचा शिक्षक विक्रम सखाराम जाधव यास विद्यार्थ्यांशी लंगिक चाळे केल्याप्रकरणी अलिबाग येथील विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी पाच वष्रे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. नवीन पनवेल येथील सेक्टर १९ येथे असलेल्या गुरुकुल कोचिंग क्लासमध्ये पीडित विद्यार्थी जात होता.
या क्लासमध्ये विक्रम जाधव संस्कृत विषय शिकवत होता. विक्रम जाधव आपल्या मुलांशी लंगिक चाळे करीत असल्याची फिर्याद पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार विक्रम जाधव याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १५५ व दि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्चुअल ओफेन्स अ‍ॅक्टचे कलम ९(एल)(ओ)(पी), १० अन्वये गुन्हा दाखल करून खांदेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. महेश मधुकर ठाकूर यांनी बाजू मांडली. सर्व साक्षी पुरावे पाहून विशेष न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी विक्रम जाधव याला दोषी ठरविले. त्याला भारतीय दंड संहिता कलम ३५५ अन्वये १ वष्रे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिन्यांची सक्तमजुरी. तर दी  प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्चुअल ओफेन्स अ‍ॅक्टचे कलम ९(एल)(ओ)(पी), १० अन्वये गुन्हा, ५ वष्रे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वष्रे सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. पाच हजार रुपये दंडाची रक्कम पीडित मुलाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या गुन्ह्य़ाचा तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी . सूर्यवंशी यांनी केला होता.