News Flash

शिक्षकाचे चिमुकल्याशी अनैसर्गिक कृत्य

शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान या घटनेने दिग्रसमध्ये संतापाची लाट उसळली होती.

दिग्रस पोलीस ठाण्यावर संतप्त जमाव
या जिल्ह्य़ातील दिग्रस येथील एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या मुलासोबत त्याच शाळेतील शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार काल, शुक्रवारी उघडकीस आला आहे. या शिक्षकाला अटक करून जमावाच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी दिग्रस पोलीस ठाण्यावर हजारो संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला.
दिग्रसच्या दिवं. सरूबाई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत निलेश बदुकले नावाचा शिक्षक आहे. तो याच शाळेतील मुलांचे आपल्या घरी शिकवणी वर्ग घेतो. काल दुपारी असाच शिकवणीचा वर्ग संपल्यावर सर्व मुले घरी जायला निघाले तेव्हा शिक्षक निलेश बदुकलेने एका ११ वर्षीय विद्यार्थ्यांला थांबायला सांगितले. सर्व मुले गेल्यावर या शिक्षकाने त्या मुलाला परीक्षेत गुण वाढवून देतो, असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनसíगक कृत्य केले. पीडित मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर त्या मुलाच्या आईवडीलांच्या तक्रारीवरून ‘त्या’ शिक्षकाविरुध्द दिग्रस पोलिसांनी बाललंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान या घटनेने दिग्रसमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकारानंतर त्याने हा सारा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्याच्या गुप्तांगातून रक्त येत होते. तातडीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
घटनेचे वृत्त गावात पसरताच पोलीस ठाण्यावर दीड-दोन हजार संतप्त नागरिकांचा जमाव धडकला. आरोपी तरुण शिक्षकाला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, एका महत्त्वाच्या बैठकीत असल्याने घटनेची सविस्तर माहिती समजली नाही. मात्र, आपण चौकशी करीत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 1:15 am

Web Title: teachers held for molesting class v girl student
Next Stories
1 निसर्ग संपन्न धारगडला आजपासून यात्रा महोत्सव
2 लाड यांच्या निषेधार्थ आंदोलन
3 सोलापूर जिल्हा बँकेपुढे अस्तित्वाचे आव्हान
Just Now!
X