15 December 2017

News Flash

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना एकवटल्या

जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा

अलिबाग : | Updated: June 19, 2017 2:15 AM

जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा

आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्याम दुर्लक्षाविरोधात राज्यलभरातील शिक्षक संघटना आता एकवटल्या  आहेत. रायगड जिल्ह्य़ातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रायगड जिल्हाक परीषद ते जिल्हालधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याात आला यावेळी समितीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .

राज्यनभरातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी अनेकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांची भेट घेवून चर्चा केली . आपल्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या . सचिव पातळीवर झालेल्या बठकांमध्येतही शिक्षक संघटनांनी आपली गाऱ्हाणी मांडली परंतु शासनाने वेळोवेळी त्याकडे दुर्लक्ष केले . त्यामुळे  हा सर्व संघटनांच्या  समन्वय समितीने मोर्चा काढला . क्रीडाभूवन मदानातून निघालेला हा मोर्चा प्रथम जिल्हा परीषद येथे थांबला. तेथे शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.  शिक्षकांच्या  बदल्या या समायोजनाने योग्यवेळी कराव्याात . बदल्यांमधून महिला शिक्षकांना वगळावे , शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने यावर्षी बदल्या  करू नयेत , एकूण सेवेऐवजी प्रत्येदक तालुक्यातील १० वर्षांची सेवा ग्राहय धरावी , २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शलन योजना लागू करावी , सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत , केंद्रप्रमुखांना कायम प्रवासभत्ता मंजूर  करावा , सर्वच विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी द्यावी ,  अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या . या मोर्चात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती .

महाराष्ट्रि राज्य प्राथमिक शिक्षक परीषदेचे अध्ययक्ष राजेश सुर्वे , संजय निजापकर ,  शिक्षक सेनेचे निर्भय म्हा त्रे  प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र म्हापत्रे , शिक्षक समितीचे अनिल नागोठकर , जुनी पेन्शिन संघटनेचे सोपान चांदे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले .

आमचा बदल्यांना अजिबात विरोध नाही . तसा केवळ गरसमज पसरवला जात आहे. बदल्यांबाबतच्या शासनाच्या धोरणाला आमचा विरोध आहे.  २७ फेब्रुवारी २०१७ च्या् शासन निर्णयात ज्याा जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्या रद्द कराव्यात यासाठी आमचा लढा आहे . – राजेश सुर्वे , अध्यक्ष महाराष्ट्रश राज्यच प्राथमिक शिक्षक परिषद

 

First Published on June 19, 2017 2:15 am

Web Title: teachers protest for pending demands