28 February 2021

News Flash

शौचालयांच्या रंगरंगोटीचे शिक्षकांना काम 

शिकवण्याच्या कामांव्यतिरिक्त कामांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

कोल्हापूर शिक्षणाधिकाऱ्यांचे फर्मान

मुंबई : विविध सरकारी कामांच्या अतिरेकामुळे त्रासलेल्या शिक्षकांच्या गळ्यात गावातील शौचालये रंगवण्याचे कामही पडले आहे.  शौचालय दिन साजरा करण्यासाठी गावातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या घरातील शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर बोधवाक्य लिहिण्याचे फर्मान कोल्हापूर जिल्हा परिषदेने सोडले आहे.

सकाळी उघडय़ावर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्यांचे डबे जप्त करण्यापासून ते विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण शिजवून देण्यापर्यंतची अनेक कामे शिक्षकांकडून करून घेण्यात आली आहेत. शिक्षकांना लसीकरण मोहिमा, निवडणुकीची कामे, सर्वेक्षणे आदी कामांना जुंपण्यात येते. कोल्हापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर कडी करून शिक्षकांना शौचालये रंगवण्याची सूचना केली आहे. शौचालय रंगवण्याचे हे ‘राष्ट्रीय काम’ मुदतीत पूर्ण करण्याची तंबीही अधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिली आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या घरातील शौचालये शिक्षकांनी रंगवायची आहेत.

कोल्हापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनाही सोडलेले नाही. राज्य छात्र सेना, राष्ट्रीय छात्र सेना, स्काउट-गाइड या उपक्रमातील विद्यार्थ्यांची मदत शिक्षकांनी शौचालयांच्या रंगरंगोटीसाठी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे. शौचालये रंगवून त्यावर स्वच्छतेची संदेशवाक्ये लिहायची आहेत आणि याचा अहवाल ३१ जानेवारीपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवायचा आहे. या रंगकाम आणि संदेशवाक्यांसाठी गाव स्तरावर पारितोषिके देण्यात येणार आहेत.

शिकवण्याच्या कामांव्यतिरिक्त कामांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. याबाबत जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकांनी सांगितले, ‘‘शासनाकडून सतत अभियाने आणि योजनांच्या सूचना येतात. अनेक योजनांचे काम गावातील इतर कुणीही करू शकेल असे असते. मात्र, त्यासाठी शिक्षकांनाच वेठीला धरले जाते. एकीकडे शाळाबाह्य़ कामे कमी केल्याचे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 2:37 am

Web Title: teachers to do toilets colored work in the village
Next Stories
1 पाच नगरपालिकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा
2 पद्मश्री लाभूनही ‘गोपालक’ शब्बीरभाईंचा जीवनसंघर्ष सुरूच!
3 हंसराज अहिर यांच्यासाठी दिल्लीचा मार्ग सोपा?
Just Now!
X