25 October 2020

News Flash

तेजस ठाकरेंना सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमध्ये हिरण्यकश नदीत सापडला नवा मासा; नाव ठेवलं…

या नव्या प्रजातीला जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनाही मान्यता दिली

संपूर्ण कुटुंब राजकारणात असूनही राजकारणापासून लांब राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी माश्याची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. तेजस यांनी सह्याद्री पर्वत रांगांमध्ये या प्रजातीचा शोध लावला आहे. अंबोली गातामधील हिरण्यकश नदीमध्ये तेजस यांनी सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा शोधला आहे. सोनेरी रंगाचे केस असणारी ही माशांची २० वी प्रजाती असून तेजस ठाकरेंनी शोध लावलेली चौथी प्रजाती आहे. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पाली आणि खेकड्यांच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढलेल्या.

तेजस यांनी लावलेल्या या शोधाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्रासंदर्भातील मासिकांनाही मान्यता दिली आहे. या प्रजातीसंदर्भातील लेख नावाजलेल्या मासिकांमध्ये छापून आले आहेत. ही प्रजाती हिरण्यकश नदीत सापडल्यामुळे त्याचे नाव हिरण्यकेशी असं ठेवण्यात आलं आहे. हिरण्यकेशी हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सोनेर रंगाचे केस असणारा असा होता. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांनी केलं. त्यांनीच या संशोधनासंदर्भातील पेपर सादर केला आहे. प्रवीणराज आणि तेजस यांना या संशोधनामध्ये पाण्याखाली छायाचित्रण करण्यासाठी प्रसिद्ध असणारे छायाचित्रकार शंकर बालसुब्रमण्यम यांचे सहकार्य मिळाले.

यापूर्वी शोधलेत ११ प्रकारचे ‘सह्याद्रीयाना’ खेकडे

२०१८ साली तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये खेकड्यांच्या ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. न्यूझिलंडमधील एका नियतकालिमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांसह कोकण, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगरमधील जंगल तसेच दऱ्याखोऱ्यात फिरून या खेकड्यांच्या प्रजाती शोधल्या. तेजस यांनी शोधलेल्या खेकड्यांमध्ये एक गोड्या पाण्यातील खेकड्याच्या प्रजातीचाही समावेश आहे.  या नव्याने सापडलेल्या प्रजातींची नावेही काहीशी हटके ठेवण्यात आली. ‘सह्याद्री’ या रांगड्या मराठी नावावरून खेकड्याची नावे ठेवण्यात आली . ‘सह्याद्रीयाना’ असे या खेकड्यांचे नामकरण करण्यात आले. घाटीयाना बोट्टी, घाटीयाना पल्च्रा, घाटीयाना रथब्युने, गुबेरनाटोरीयाना लॉँगीपेस, गुबेरनाटोरीयाना मार्लेश्वरेनेसीस, गुबेरनाटोरीयाना वालासेई, सह्याद्रीयाना बिल्यारजानी, सह्याद्रीयाना पाछेपालूस, सह्याद्रीयाना सह्याद्रीनेसीस, सह्याद्रीयाना टेन्यूफालस, सह्याद्रीयाना वुडसासोनी अशी नाव या खेकड्यांच्या प्रजातींना देण्यात आलीयत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:17 pm

Web Title: tejas thackeray son of cm uddhav thackeray discovered new fish species in sahyadri hill range scsg 91
Next Stories
1 जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…
2 खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 पीक पाण्यात!
Just Now!
X