News Flash

VIDEO: अल्लू अर्जुनने केली करोनावर मात; १५ दिवसानंतर भेटला कुटूंबीयांना

घरी परतल्यानंतर मुलांनी मारली मिठी

(Photo: Instagram/alluarjunonline)

‘साऊथचा सुपरस्टार’ अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वीच करोनाच्या जाळ्यात सापडला होता. करोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. ही बातमी ऐकून त्याचे चाहते आश्चर्यचकीत झाले होते. पण आता सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुनने करोनावर यशस्वी मात केली आहे. नुकताच त्याचा करोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिलीय.

करोना झाल्याचं कळताच सुपरस्टार अल्लू अर्जुन १५ दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये गेला होता. अवघ्या १५ दिवसांमध्येच अल्लू अर्जुनने करोनाला हरवलं आणि आपल्या घरी सुखरूप परतला आहे. १५ दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेल्या अल्लू अर्जुनने करोनावर मात केल्यानंतर एक व्हि़डीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये १५ दिवसानंतर अल्लू अर्जुन आपल्या घरी मुलांना भेटण्यासाठी जाताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन लिफ्टमधून बाहेर पडताच त्याचा मुलगा आनंदाने त्याच्या गळ्यात पडून मिठी मारताना दिसून येत आहेत. त्यानंतर त्याची मुलगी ही त्याच्याजवळ येते आणि गळ्यात पडते. आपले वडील करोनातून बरे होऊन घरी सुखरूप आले आहेत, याचा आनंद या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे पाहून अल्लू अर्जुनही त्याच्या मुलांसोबत खेळू लागतो.

हा व्हिडीओ शेअर करताना सुपरस्टार अल्लू अर्जुनने एक कॅप्शन ही लिहिली आहे. यात त्याने लिहिलंय, “माझ्या कुटूंबियांना १५ दिवसानंतर भेटतोय….करोना निगेटिव्ह आलो आहे…आणि १५ दिवसांचा क्वारंटाइन ही संपलाय…मला माझ्या मुलांची खूप आठवण येत होती…मी बरा होण्यासाठी प्रार्थना करणारे माझे चाहते आणि हितचिंतकांचे खूप खूप आभार…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

लवकरच ‘पुष्पा’मध्ये झळकणार
सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो ‘पुष्पा’ चित्रपटात झळकताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर आधीच प्रदर्शित करण्यात आलाय. परंतू, चित्रपटाची शूटिंग अजुनही सुरूच आहे. या चित्रपटाची बरीचशी शूटिंग पूर्ण झालेली आहे. परंतू सध्याच्या करोना परिस्थितीमुळे उर्वरित शूटिंगसाठी अडचणी आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 5:18 pm

Web Title: telugu superstar allu arjun tests negative for covid shares good news prp 93
Next Stories
1 Covid Vaccination : मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा : पटोले
2 “अजित पवार यांनी पोरकट विधान करून…,” भाजपा नेत्याकडून संताप व्यक्त करत गंभीर आरोप
3 SRPF च्या जवानांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा; ‘ही’ अट केली शिथिल
Just Now!
X