News Flash

तेरणा सहकारी साखर कारखाना अखेर डीसीसीच्या ताब्यात

अनेक नियमांचा भंग केल्यानं अखेर साखर कारखान्यावर कारवाई

News, Terna sugar factory
संग्रहित छायाचित्र

मराठवाड्यातील सर्वात मोठा साखर कारखाना अखेर डीसीसीच्या ताब्यात जाणार आहे हे निश्चित झालं आहे. हा शेतकरी सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला आहे, साखर सहसंचालकांनी तेरणा साखर कारखान्यावर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्थी बँकेचे कार्यकारी संचालाक विजय घोणसे पाटील यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे.कारखान्याच्या वतीने महिनाभरात खुलासा अथवा समाधानकारक म्हणणे न मांडल्यास हा आदेश कायम केला जाईल, असेही साखर संचालकांनी आदेशात म्हटले आहे.

तेरणा साखर कारखाना हा उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकीय केंद्र म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे. जिल्हा बँकेनं अखेर या साखर कारखान्यावर ताबा मिळवला आहे. यापूर्वी साखर सहसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना कारखान्यावर प्रशासक म्हणून नियुक्त केलं होतं.

गाळप क्षमतेचा अपुरा वापर, गाळप परवाना घेण्यासाठी आवश्यक कारवाई न करणं, आरसीसीसाठी लागणारी कागदपत्रं उपलब्ध करून देतानाची टाळाटाळ, विविध कायद्यांच्या तरतुदींचं उल्लंघन, चौकशीसाठी महत्त्वाचे अभिलेख उपलब्ध करून न देणं, शासकीय देणी भरणा करताना टाळाटाळ, संचालक मंडळांमधील राजीनाम्यांमुळे दैनंदिन कामांवर होणारा परिणाम असे आक्षेप नोंदवून प्रशासकाला कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकांनी जानेवारी महिन्यात दिलेल्या अहवालात तेरणा कारखाना अवसायनात घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीकांत देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे.

ज्या हेतुसाठी कारखान्याची स्थापना करण्यात आली. त्याला संचालक मंडळाने हरताळ फासला असल्याचे सांगत तेरणा कारखान्यावर अवसायक नेमण्याच्या निर्णयावर आपण पोहचलो असल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

कारखान्यातील भंगार चोरी, २०१२ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपूनही संचालक मंडळाने केलेले बेजबाबदार वर्तन, सर्वसाधारण सभा न घेण्यासाठी हेतुत: करण्यात आलेले प्रयत्न, चौकशीसाठी केलेली टाळाटाळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जप्रकरणी न्यायाधिकरणाने दिलेले जैसे थे आदेश, कारखान्याकडे थकीत असलेल्या १२७ कोटी ३७ लाख रुपये कर्जावर वाढत असलेले अनावश्यक व्याज आदी बाबीचा विचार करुन तत्कालीन जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांनी कारखाना अवसायनात घेण्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीचे केंद्रस्थान असलेल्या तेरणा कारखान्याचा ताबा अखेर जिल्हा बँकेकडे देण्याचा अंतिम आदेश साखर सहसंचालकांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 9:44 pm

Web Title: terna cooperative sugar factory is take over by dcc
Next Stories
1 ‘ती’ नरभक्षक वाघीण सांभाळण्यासाठी विकास निधी
2 सरपंचांच्या थेट निवडीने सामाजिक दरी रुंदावणार?
3 घोडामैदान दूर असूनही मोर्चेबांधणीला वेग
Just Now!
X