नंदुरबार जिल्हयातील तोरणमाळ भागातील सिंदी दिगर घाट या अतिदुर्गम परिसरात प्रवासी वाहतूक करणारी एक जीप दरीत कोसळ्याने भीषण अपघात घडला. या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे. या जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप सायंकाळच्या सुमारास सिंदी दिगर घाटातील दरीत कोसळली. त्यावेळी जीपमध्ये जवळपास ३० प्रवासी होती. हा अपघात एवढा भीषण होता की, जीप दरीत कोसळल्यानंतर त्या जीपचा अक्षरशा चुराडा झाला व जीपमधील आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील काही प्रवाशांनी जीप दरीत कोसळत असताना बाहेर उड्या टाकल्या ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Central Railway, 8 percent Increase, 7 thousand crores, Passengers, Becomes Top, Passenger Transporting, Indian Railway, marathi news,
प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची ७,३११ कोटींची कमाई

दुर्घटना घडली तो भाग अतिदुर्गम असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवत आहे. तर अपघातमधील जखमींना तोरणमाळसह अन्य स्थानिक ठिकाणच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले जात आहे. पोलीस अधिक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.े