19 January 2021

News Flash

ठाकरे सरकारबद्दल शरद पवारांनी वर्तवलं ‘हे’ भाकीत

मला महाराष्ट्राची माहिती आहे...

तीन चाकांचं सरकार अशी टीका ठाकरे सरकारवर विरोधक कायमच करत आले आहेत. हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, असा दावाही विरोधक सातत्यानं करत आले आहेत. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवलं आहे.

सरकारबद्दल कुणाला काही म्हणायचं आहे ते म्हणू दे, मला महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी विधीमंडळ वार्ताहर संघात माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलं आणि सर्वांना घेवून काम करत आहेत, अशी स्तुतीही पवारांनी केली.

सरकार पाडण्याबाबत उलटसुलट चर्चा व प्रयत्न होतो आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर शरद पवार म्हणाले की, शिमगा नुकताच संपला आहे. त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही, असं मला वाटतं, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 5:37 pm

Web Title: thackeray government will complete a five year term says sharad pawar pkd 81
टॅग Ncp,Uddhav Thackeray
Next Stories
1 “तपकीर ओढल्याने करोनाचा विषाणू मरू शकतो”; महाराष्ट्रातील भाजपा नेत्याचा दावा
2 “चाइल्ड पोर्नोग्राफीवर नियंत्रणासाठी राज्यात कायदा करणार”
3 मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही – संजय राऊत
Just Now!
X