News Flash

ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस जाहीर

वेतन थकल्याने एका एसटी कंडक्टरने आज आत्महत्या केली.

(संग्रहित छायाचित्र)

जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले आहे.

आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याने पत्रात काय म्हटले होते?
‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 5:09 pm

Web Title: thackeray govt announced bonus one month salary to st workers dmp 82
Next Stories
1 दोन कुटुंबं उघड्यावर आली; दोषींवर काय कारवाई करणार? -देवेंद्र फडणवीस
2 अर्णब गोस्वामी यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात; उच्च न्यायालयाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी
3 बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी सण साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय
Just Now!
X