16 February 2019

News Flash

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नीला आणि मुलीला डेंग्यू

आयुक्तांच्याच पत्नीला आणि मुलीला डेंग्यूची लागण झाल्याने ठाणेकर सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो आहे

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्य पत्नीला आणि मुलीला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यूची लागण झाल्याने या दोघींनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दोघींनाही ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी सिद्धी आणि मुलगी स्नेहा या दोघींना एकाच वेळी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी हे सगळेजण राहात होते. ठाण्याच्या आयुक्तांच्या पत्नीला आणि मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

डेंग्यू कशामुळे होतो?
डेंग्यू हा एक विषाणूजन्य ताप असून तो एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. त्याच्याकडून संक्रमितही होतो. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही याची लागण लवकर होते. जास्त प्रमाणत ताप येणे, डोक्याचा पुढचा भाग दुखणे, डोळ्यांच्या मागील भागांमध्ये वेदना होणे, चव न समजणे, भूक मंदावणे, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणेही या आजारात दिसून येतात.

१९४० पासून भारतात डेंग्यू संक्रमणाचे प्रमाण वाढले. स्वच्छतेचा अभाव, अकार्यक्षम डास नियंत्रण यामुळे याचा प्रादुर्भाव होतो. आता ठाण्यात आयुक्तांच्याच पत्नीला आणि मुलीला डेंग्यूची लागण झाल्याने ठाणेकरांचे आरोग्य वाऱ्यावर आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

First Published on July 12, 2018 7:00 pm

Web Title: thane municipal commissioners wife and daughter suffering from dengue hospitalized in jupiter hospital