ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली आहे. अमरावती येथून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोघा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे 10 पिस्तूल आणि 40 जिवंत काडतूसं सापडली आहेत. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अशी या आरोपींची नावे आहेत.
ठाणे पोलिसांना शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये श्स्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. 10 ते 70 हजारांपर्यंत या बेकायदेशीर शस्त्रांची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शस्त्रांसहित पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रोकड आणि 10 मोबाइल जप्त केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 12:44 pm