26 February 2021

News Flash

ठाणे : पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या करुन आईचीही आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइट नोट लिहून ठेवली होती

(सांकेतिक छायाचित्र)

सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून ठाण्यामध्ये एका महिलेने दोन मुलांची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइट नोट लिहून ठेवली होती. त्यावरून कासारवडवली पोलिस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

सिताबेन राजेश वाविया (२८) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून लक्ष्य वाविया (५) आणि रूद्र वाविया (४) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. महिलेने दोन मुलांना गळफास देऊन हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी हे कुटुंब गुजरात येथून कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघबीळ रोड येथील ग्रीन एकर्स इमारतीमध्ये राहण्यास आले होते. रविवारी दुपारी सीताबेन हिने तिच्या दोन मुलांची गळफास लावून हत्या केली. त्यानंतर तिने स्वतः गळफास लावत आयुष्य संपवले. मृतदेहाजवळ पोलिसांना एक गुजराथीमध्ये लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळू आत्महत्या करत असल्याचे तिने लिहिले होते. तसेच मुलांना पतीच्या हाती सोपवण्याची इच्छा नसून तो पापी असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 2:53 pm

Web Title: thane woman kills two kids then commits suicide sas 89
Next Stories
1 तोतया तिकीट तपासणीस अटकेत  
2 कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठातांचे पद धोक्यात
3 कोटींचा खर्च तरीही टँकरचा फेरा
Just Now!
X