28 May 2020

News Flash

ठाण्यातील तरुणीचा हडसर किल्ल्यावरून पडून मृत्यू

किल्ल्यावर चढाई करत असताना घडली घटना

प्रतिनिधिक छायाचित्र

शिवजयंती निमित्त जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेलेल्या ठाण्यातील तरुणीचा, किल्यावर चढाई करताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाला. सिद्धी कामठे असं मृत तरुणीचे नाव आहे. आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

शिवजयंती निमित्त राज्यासह देशभर विविध कार्यक्रम सुरू आहेत. सर्वत्र जल्लोषात शिवजंयती साजरी केली जात आहे. विविध पक्ष, संघटना देखीन अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर चढाई करण्यास गेला होता. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धी देखील होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास चढाई सुरू असताना सिद्धीचा पाय घसरला व ती किल्यावरून साधारण चारशे फुट दरीत पडली.

घटनेबाबत माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिला बाहेर काढलं गेलं. यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 6:08 pm

Web Title: thanes young girl dies after falling from fort msr 87
Next Stories
1 Loksatta Poll: महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्यास होणार ‘टफ फाईट’
2 Video: बेल्जियमचा शिवप्रेमी.. २ महिन्यात २०० गडकिल्ल्यांना दिली भेट
3 … तर फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार -गृहमंत्री अनिल देशमुख
Just Now!
X