कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यात सर्वात जास्त म्हणजेच इष्टांकापेक्षा १५८ टक्के जादा पीक कर्जाचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मोठ्या मनाने जिल्हा बँकेचे कौतुक केल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा आभारी आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ समर्थकांकडून चंद्रकांतदादा पाटील यांना बुधवारी धन्यवाद देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

मुश्रीफ यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे समर्थक संचालक भैय्या माने यांनी म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी यांचे निवेदन हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष या नात्याने होते. रिझर्व बँकेच्या आदेशाप्रमाणे बँकेने खावटी कर्ज व मध्यम मुदत कर्जाचा हप्ता ३० जूनपर्यंत मुदतवाढ देऊन त्यांनाही पिक कर्ज देण्याचे बँकेने धोरण राबवले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा करा, असे खुले आव्हान केले होते.

समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा –
आमदार पाटील यांनी आमच्या बँकेचे केलेले कौतुक त्यांच्या इंग्रजी भाषेत शिकलेल्या सहकाऱ्यांना समजावून सांगावे, असे म्हणत माने यांनी मुश्रीफ यांचे राजकीय स्पर्धक, भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधल्याचेही दिसून आले.