News Flash

…म्हणून ‘स्वाभिमानी’ने घेतला कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय

संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले नेमके कारण

(संग्रहित छायाचित्र)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गाव ते राज्यपातळीपर्तंची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापूरात झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा केली. तसेच, विभागीय व राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संघटनेची पुर्नबांधणी, अनेक पदाधिकाऱ्यांना बढती देणं किंवा नव्यानं संघटनेत प्रवेश केलेल्यांना संधी देण्यासाठी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीच्या पहिल्या सत्रात सविस्तर चर्चा होऊन संघटनेची पुर्नबांधणी, अनेक पदाधिकाऱ्यांना बढती देणं किंवा नव्यानं संघटनेत प्रवेश केलेल्यांना संधी देणे इत्यादींसाठी आहे ती कार्यकारिणी बरखास्त करून, महिनाभराच्या अगोदर नव्या निवडी जिल्हापातळीवर करायच्या व त्यानंतर पुढील महिनाभरात प्रदेशपातळवरील निवडी करायच्या आहेत. अशा प्रकारचा संघटना पुर्नबांधणीचा दोन महिन्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला  असल्याची शेट्टी यांनी माहिती दिली आहे.

तसेच, गाव ते राज्यपातळीपर्यंतची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली आहे. कारण, अनेकांचा दोन वर्षांचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे एकाचवेळी गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा निवडी करून, अनेकांना वरिष्ठ पातळीवर, राज्यपातळीवरील जबाबदाऱ्या सोपवायच्या आहेत. या दृष्टीने आगामी ११ जानेवारीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंतची संघटनेची बांधणी पूर्ण करायची, त्यानंतर ११ जानेवारी ते ११ फेब्रवारी या महिनाभराच्या कालावधीत प्रदेश पातळवरील बांधणी होईल. यानंतर राज्य कार्यकारिणीची पुन्हा बैठक घेऊन यांची निश्चिती होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 3:37 pm

Web Title: thats why swabhimani dismissed the executive committee from village to state level msr 87
Next Stories
1 अवघ्या तीन तासात पंकजा मुंडेंच्या पोस्टरवर ‘कमळ’
2 जीएसटीचे १५ हजार ५५८ कोटी रुपये द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
3 शरद पवार आणि भाजपा हे समीकरण कधीही जुळणार नाही- आव्हाड
Just Now!
X