03 December 2020

News Flash

पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

आंतरराज्य तीन साखळी गुन्ह्याची उकल

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: डहाणू तालुक्यातील सायवन पोलीस चौकी येथे दुचाकीवरून एका इसमाचे अपरण होत असल्याचे समजल्यानंतर समय सूचकता व कर्तव्यदक्षता दाखवल्याने पालघर पोलिसांनी तीन साखळी गुन्ह्याचा उकल केली असून याप्रकरणी अपहरण केलेल्या दोन व्यक्तींची सुटका झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात तेरापेक्षा अधिक आरोपी असून त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सायवन पोलीस चौकीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाच्या समोरून भरधाव दुचाकी जाताना त्यावर बसलेल्या एका इसमांनी मदतीची हाक दिली. पुढे जाऊन या व्यक्तीने दुचाकी वरून उडी मारली असता या पोलीस शिपायाने स्थानिकांची मदत घेऊन अपहरण होत असलेल्या व्यक्तीची सुटका केली. कासा पोलिसांनी इतर पोलिसांच्या मदतीने याप्रकरणी पाच आरोपींना पकडले असून तलवारीचा वापर करताना जखमी झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर पोलिसांनी तपासाची चक्रे शीघ्र गतीने फिरवून आंतरराज्य तीन गुन्ह्यांचा शोध घेतला आहे.

पैसे दुप्पट करतो असे सांगून प्रथम खोटे प्रात्यक्षिक दाखवून खानवेल, मोखाडा व जव्हार येथील व्यक्तींनी वापी येथे काम करणाऱ्या एका ईसमला दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन चारोटी जवळ जंगलात दसऱ्या च्या सुमारास बोलवले होते. पूजा पाठ करून त्याची दिशाभूल करत संबंधिताला डोळे झाकण्याचे सांगून संबंधितांनी पलायन केले. याप्रकरणी जादू टोणा प्रतिबंधक कायदा, फसवणूक व दरोडा टाकण्याचे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर संबंधित व्यक्तीने खानवेल येथील मध्यस्थीला पाचारण केले. त्या व्यक्तीने पुढे तीन साथीदारांच्या मदतीने पहिल्या गुन्ह्यातील मोखाडा येथील एका आरोपीला तीन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केले. तसेच पैसे दुप्पट करतो प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीला पूर्ण पैसे न दिल्यास अपहरण केलेल्या व्यक्तीला मारून मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी अपहरण केल्याचे व खंडणी करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या वडिलांचे अपहरण केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या मुलांनी पाच साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या गुन्ह्यातील अपरणकर्त्यापैकी एकाचे पुन्हा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित आरोपीला दुचाकी वरून घेऊन जात असताना सायवन पोलीस चौकी वरील पोलीस कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवल्याने या तिन्ही गुन्ह्याची उकल झाली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गुन्ह्यात पोलिसांकडे कोणतीही फिर्याद दाखल झाली नसताना दक्ष असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे तसेच पालघर पोलिसांच्या सांघिक कामगिरी केल्याने हे सर्व तिन्ही प्रकरण उघडकीस आल्याचे पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषद माहिती दिली. याप्रकरणी कासा पोलिसां ठाण्यात गुन्हा दाखल होत असून सर्व संबंधित पोलिसांना पोलीसांना अधीक्षक यांनी 30 हजार रुपयांचा एकत्रित पुरस्कार जाहीर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 7:51 pm

Web Title: the abduction attempt was failed due to the vigilance of the police personnel scj 81
Next Stories
1 शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार-नारायण राणे
2 मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे-सुप्रिया सुळे
3 केंद्राने दिलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटींचा निधी-फडणवीस
Just Now!
X