News Flash

पराभवाच्या भीतीने भाजपकडून युतीसाठी आग्रह- रामदास कदम

शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही.

पर्यावरणमंत्री रामदास कदम (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचा नकार कायम

औरंगाबाद : शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही. सध्या भाजपवाले युती होणारच म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्याची चाल खेळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तर दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही. यात शिवसेनेचे कोणतेही नुकसान नाही. संभाव्य लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या नुकसानीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली, अशी टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी केली. युती होणार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल, हा दावाही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोडय़ाच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपावर केली. २०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची उलट गणती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपचे आमदार खून, बलात्कारांच्या आरोपात अटक होत आहेत. समाजातील नामचीन गुंडांना पक्षात आणून भाजपाने आमदार, खासदार बनवले असल्यामुळे दुसरे काय घडणार, असा सवालही कदम यांनी केला.

भाजपचा खरा चेहरा समाजासमोर उघडा पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेही कधी सुडाचे राजकारण केले नाही. मात्र, त्यास भाजप अपवाद आहे. शिवसेनेतील काही नेत्यांना पदाची, पशांची लालूच दाखवून फोडण्याचे घाणेरडे राजकारणही भाजपने खेळले आहे. याची किंमत भाजपाला      चुकवावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाचा खरा चेहरा समोर आल्यामुळे जनतेला शिवसेनेकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख आणि पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत घेण्यास तयार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:49 am

Web Title: the bjp defeat fear urges for alliance says ramdas kadam
Next Stories
1 मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी
2 अर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान
3 विदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली
Just Now!
X