करोनाचा कहर देशात आणि राज्यात वाढतो आहे. अशात सोलापुरातल्या सांगोल्यात सगळे नियम पायदळी तुडवत बैलगाडा शर्यत पार पडली आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी या ठिकाणी बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पार पडली अशी माहिती समोर आली आहे. या शर्यतीच्या वेळी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे करोनाचा धोका वाढण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणी आयोजकांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन आहे. अशात लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न येता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन वारंवार राज्य आणि केंद्र सरकारकडून केलं जातं आहे. हा नियम पाळला जात असल्याचंही दिसून येतं आहे. मात्र याच नियमाला हरताळ फासण्याचा प्रकार सोलापुरातल्या सांगोला या ठिकाणी घडला आहे. सगळे नियम धाब्यावर बसवून घेरडी या गावात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. आयोजकांसह १० बैलगाडा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

खरंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली आहे. अशात लॉकडाउन पुकारण्यात आलेला असताना बैलगाडा शर्यत घेण्यात आली. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आले. या घटनेमुळे करोनाचा धोका वाढण्याची भीती आहे.

करोना विषाणू संसर्गाने सर्वत्र थैमान घातल्यामुळे देशभर टाळेबंदी लागू आहे. अशात कशाचीही पर्वा न करता बैलगाडा आणि घोडागाड्यांच्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करुन आयोजक संतोष खांडेकर आणि दहा बैलगाडी आणि घोडागाडी चालकांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.