News Flash

बल्लारपूर शहराला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून ‘थ्री स्टार’ दर्जा

या अगोदर रेल्वे विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत बल्लारपूर रेल्वे स्थानक देशातील सर्वोत्कृष्ट ठरलेले आहे.

बल्लारपूर शहराला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून ‘थ्री स्टार’ दर्जा
संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्या, तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्या बल्लारपूर शहराला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून कचरा मुक्त शहर म्हणून ‘थ्री स्टार दर्जा’  देण्यात आला आहे. केंद्रीय गृह आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी आज ही माहिती जाहीर केली आहे.

बल्लारपूर शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. बल्लारपूर शहरानजिक देशातील २९ वी सैनिकी शाळा, अत्याधुनिक क्रीडांगण, बसस्थानक, स्मार्ट पोलीस स्टेशन असा विविध विकासकामांचा नवा आयाम या शहराला मिळाला आहे.

विशेषत: नगर परिषदेच्या माध्यमातुन स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्यात आली असून, त्यासंबंधी विविध उपक्रमही राबविण्यात आले आहेत. या आधीही रेल्वे विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक ठरले आहे.

बल्लारपूर शहराला थ्री स्टार दर्जा (कचरा मुक्त शहर) देण्यात आल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी तसेच बल्लारपूरकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2020 5:36 pm

Web Title: the city of ballarpur has been awarded three star status by the union ministry of urban development msr 87
Next Stories
1 चंद्रपूर : ताडोबाच्या बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
2 आशा सेविकांना ठाकरे सरकारकडून मोठा दिलासा; मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी
3 सलून सुरु करण्यास ठाकरे सरकारची परवानगी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Just Now!
X