News Flash

शहीद जवान किरण थोरात यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद सैनिक किरण पोपटराव थोरात यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद सैनिक किरण पोपटराव थोरात यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. किरण थोरात हे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात असलेल्या फकिराबाद वाडी, पो. लाडगावचे रहिवासी आहेत. जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानच्या नापाक हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले. थोरात यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. औरंगाबाद विमानतळावर शहीद किरण थोरात यांचे पार्थिव आणण्यात आले. विमानतळावर त्यांच्या पार्थिवावाल १६९ मीडियम रेजिमेंटच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले आहे.

शहीद किरण थोरात यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीर येथील पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात औरंगाबादचे जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. किरण थोरात हे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आरती आणि दोन वर्षांची मुलगी आहे. थोरात यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 9:14 am

Web Title: the crematorium on the death of shaheed jawan kiran thorat today at his native place
Next Stories
1 बोईंग, महिंद्रा आणि एचएएल करणार ताशी २ हजार किमी वेगाने आकाश व्यापणाऱ्या ‘फायटर’ची निर्मिती
2 बांगलादेशने हटवलं सरकारी नोक-यांमधील आरक्षण
3 उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सेंगर यांना सीबीआयने घेतलं ताब्यात
Just Now!
X