News Flash

महाराष्ट्रात ३७५२ नवे करोना रुग्ण, १०० मृत्यू, रुग्णसंख्या १ लाख २० हजाराच्याही पुढे

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्रात ३७५२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागच्या चोवीस तासांमधली ही संख्या आहे. तर २४ तासांमध्ये १०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १६७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत ६० हजार ८३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला ५३ हजार ९०१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे.

आज राज्यात ३ हजार ७५२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. राज्याची संख्या १ लाख २० हजार ५०४ इतकी झाली आहे. यापैकी मुंबईत ६ हजार ८७५ रुग्ण आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंत ३ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णांचा डबलिंग रेट हा साप्ताहिक सरासरीनुसार कमी होतो आहे. यावरुनच कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचं स्पष्ट होतं आहे. ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मागील ३ महिन्यांच्या कालावधीत रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होतो आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वेग मंदावला

दिनांक- ३१ मार्च रुग्ण वाढीच्या दराची साप्ताहिक सरासरी १२ टक्के रुग्ण दुपटीचा कालावधी ३.५ दिवस

दिनांक ३० एप्रिल रुग्ण वाढीच्या दराची साप्ताहिक सरासरी ७ टक्के रुग्ण दुपटीचा कालावधी १०.२ दिवस

दिनांक ३१ मे रुग्ण वाढीच्या दराची साप्ताहिक सरासरी ४ टक्के रुग्ण दुपटीचा कालावधी २०.१ दिवस

१६ जून रुग्ण वाढीच्या दराची साप्ताहिक सरासरी ३ टक्के रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवस

राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५०.४९ टक्के इतकं आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.७७ टक्के इतका आहे. सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ८१ हजार ६५० लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १०० मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत ६७, भिवंडीत २७, ठाण्यात ४, वसई विरारमध्ये १ तर नागपूरमध्ये १ अशी १०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

मागील २४ तासांमध्ये जे मृत्यू नोंदवले गेले त्यापैकी ६६ पुरुष तर ४४ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ४५ रुग्ण यामध्ये होते. तर ४६ रुग्णांचे वय ४० ते ५९ वर्षे या वयोगटातील होते. ९ जणांचे वय हे ४० वर्षांच्या खालील होते. करोनामुळे महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५ हजार ७५१ झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 9:07 pm

Web Title: the current count of covid19 patients in the state of maharashtra is 120504 todaynewly 3752 patients have been identified as positive scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पं. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण : सातारा जिल्हा परिषदेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
2 उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीकडून लोणार सरोवराची पाहणी
3 ताडोबा बफर क्षेत्रलगत वाघाची शिकार : सात आरोपींना अटक, वाघाची नखं आणि हाडं जप्त
Just Now!
X