महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९६८ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंतची महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या ४ लाख ५० हजार १९६ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ८७ हजार ३० लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार २२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला १ लाख ४७ हजार १८ करोना केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 450196. Today,newly 8968 patients have been tested as positive.Also newly 10221 patients have been cured today, totally 287030 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 147018
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 3, 2020
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ४७ हजार १८ केसेस अॅक्टिव्ह आहेत. १ लाख ४७ हजार १८ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यातल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ६६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा ३.५२ टक्के इतका झाला आहे.
प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई २० हजार ५२८
ठाणे ३२ हजार १९१
पुणे ४१ हजार ६६४
सातारा १ हजार ७२४
कोल्हापूर ४ हजार ५६
नाशिक ५ हजार ५७१
औरंगाबाद- ४ हजार ८७८
नागपूर ३ हजार ४२४
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 10:19 pm