News Flash

पॉझिटिव्ह बातमी! महाराष्ट्रात २४ तासात १२ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज

सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात मागील २४ तासात १२ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७६० रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ९९ हजार ३५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ४२ हजार १५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा ३.५२ टक्के झाला आहे. सध्याच्या घडीला राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ४३ हजार ९०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४२ हजार १५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई-२० हजार ३०९
ठाणे-३० हजार ६११
पालघर-६ हजार१४४
पुणे-३८ हजार ३९७
सातारा-१ हजार ८९३
कोल्हापूर- ३ हजार९१५
नाशिक-५ हजार ६१७
अहमदनगर-२ हजार ५४६
औरंगाबाद-४ हजार ७५४
नागपूर ३ हजार ६३३

घराबाहेर पडायचं असेल तर मास्क लावा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. बाहेरून घरात आल्यावर सॅनेटायझरचा वापर करा. हात आणि पाय साबणाने धुवा. कोणतीही लक्षणं जाणवत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्या. करोनाला घाबरु नका, मात्र काळजी घ्या असं आवाहन सगळ्याच महापालिका प्रशासनातर्फे आणि शासनातर्फे करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 10:00 pm

Web Title: the current count of covid19 patients in the state of maharashtra is 457956 todaynewly 7760 patients have been tested as positive scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक : सोलापुरात करोना वॉर्डात सेवा बजाणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या
2 आज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना
3 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ? : हसन मुश्रीफ
Just Now!
X