महाराष्ट्रात करोनाचे २९३३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. आज १३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ४१ हजार ३९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये २९३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर ३.४८ टक्के राज्यात १२३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ७१ रुग्ण होते. तर ४४ रुग्ण हे वय ४० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. ८ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. १२३ पैकी ९२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत.

कोविड १९ च्या चाचणीसाठी आजपर्यंत पाठवलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार २९३ लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.