06 August 2020

News Flash

“शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घाईगर्दीत घेऊ नये”

माजी खासदाराची विनंती

(संग्रहित छायाचित्र)

“चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात शाळा ४ ऑगस्ट पासून सुरू करण्याचे विधान पालकमंत्र्यांनी केले आहे. मात्र विद्यार्थी आणि पालकांची मन:स्थिती वेगळी आहे. तेव्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घाईगर्दीने घेऊ नये,” अशी मागणी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. तसेच टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असंही ते म्हणाले.

माजी खासदार पुगलिया यांनी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना निवेदन दिले. निवेदनात जिल्ह्यात शाळा सुरू करतांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. “करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरासह दुर्गापूर, ऊर्जानगर येथे कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळातही औद्योगिक वसाहत परिसरात कामगार व अन्य लोकांसाठी प्रशासनाकडून परवानगी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे, ही अन्यायकारक बाब आहे. शेतीची देखभाल करण्यासाठी शेतकºयांना सातबारानिहाय परवाना देण्यात यावा,” अशी त्यांनी केली आहे.

“कडक टाळेबंदीच्या पहिल्या चार दिवसात जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता २६ जुलैपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार आहेत. परंतु शहरात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी चंद्रपूर तालुक्यात व लगतच्या परिसरात आहेत. शेतीची देखरेख ते शेतकरी चंद्रपूर येथून करतात. संबंधित शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे शेतजमिनीचा सातबारा आहे त्यांना येण्याजाण्याची सूट होती. कडक टाळेबंदीत एक दिवसाची पास परवानगी द्यावी असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. दररोज परवानगी घेणे शेतकऱ्यांसाठी अडचणीची बाब ठरते. त्यामुळे त्यांना औद्योगिक वसाहत व इतर कामांसाठी देण्यात आलेली परवानगी द्यावीस,” अशी मागणी पुगलिया यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात करोना आजारावर नियंत्रण आणत आहे. शंभर टक्के रूग्ण या आजारातून बरे होऊन स्वगृहीदेखील जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 5:06 pm

Web Title: the decision to start a school should not be taken by the district administration in a hurry former mp congress chandrapur jud 87
Next Stories
1 ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाकडून भाजपाच्या आयटी सेलचा वापर’
2 करोनामुळे तेलंगणातील 75 वर्षीय महिलेचा चंद्रपूरमध्ये मृत्यू, तेलंगणा राज्यात होणार मृत्यूची नोंद  
3 धक्कादायक ! लग्न समारंभात वधूची बहिणच निघाली करोना पॉझिटिव्ह, त्यानंतर …
Just Now!
X