02 March 2021

News Flash

तपास यंत्रणांनी सत्व गुंडाळून मालकाचे आदेश पाळले तरी सरकार टिकणार – संजय राऊत

कोणतेही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं

संग्रहित

तपास यंत्रणांनी सत्व गुंडाळून मालकाचे आदेश पाळायचे ठरवले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकून राहिल, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून त्यांनी हे भाष्य केलं आहे.

राऊत म्हणाले, “भाजपाचे स्वतःचे व इतर मिळून ११२ आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने महाविकास आघाडीचं सरकार हे अनैसर्गिक सरकार आहे. हे सरकार लवकरचं पडेल असं भाकीतही त्यांनी केलं आहे. पण त्यासाठी गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर आवश्यक आहे, हे त्यांना माहिती आहे. पण ईडी सारख्या संस्थांनी स्वतःचं सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहिल असं मी जबाबदारीनं सांगतो.”

कोणतेही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं

कोणतंही सरकार नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसतं जोपर्यंत ते टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचंच असतं. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीतच आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील ३७ भिन्न विचारांच्या पक्षांचं एनडीए सरकार पाच वर्षे चालवलं होतं. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटलं नाही. महाराष्ट्रावर कोविड, पूर, निसर्ग वादळ आणि लॉकडाउनसारखी संकटे आली नसती तर वर्षभरात राज्याचं चित्र बदलताना दिसलं असतं.

सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांपैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही, हे अमित शाह यांचं प्रगल्भ विधान आहे. त्यामुळे मध्य प्रदेश किंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा म्हटलं तरी राजस्थानात त्याला यश आलं नाही. अजित पवारांवर लक्ष ठेवा सांगितलं जात आहे पण तेच सर्वात जास्त भरवशाचे आहेत. मंत्र्यांची नाराजी ही व्यक्तिगत मानापमानाची आहे. बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य आहेत, अशा प्रवृत्तींविरोधात महाराष्ट्र म्हणून लढावं लागेल. आमचं संख्याबळ कमी असल्याने आमची तलवार वर्षभरापूर्वी तोकडीच होती. पण रणांगणावर आम्ही एकच पाऊल अधिक उचलून टाकल्याने आज टिकून आहोत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 9:45 am

Web Title: the government will survive even if the investigating agencies follow the orders of the owner says sanjay raut aau 85
Next Stories
1 “नेहरु सेंटरमधील ‘त्या’ बैठकीनंतर अजित पवारांनी घेतला होता तडकाफडकी निर्णय”
2 लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाण
3 ‘सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी ४४०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव’
Just Now!
X