News Flash

रानडुक्करांची सागरीमार्गाने गावात घुसखोरी

मागील काही महिन्यांपासून विरारजवळील अर्नाळा येथील शेतीवाडी भागात रानडक्करांनी हैदोस घालत मोठे नुकसान केले होते.

वसई: मागील काही महिन्यांपासून विरारजवळील अर्नाळा येथील शेतीवाडी भागात रानडक्करांनी हैदोस घालत मोठे नुकसान केले होते. असे असतानाच मंगळवारी रानडूक्करांचा कळप अर्नाळा समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांना दिसून आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे रानडुक्कर गावात शिरकाव करतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

सध्या उन्हामुळे जंगल पट्टा सुकून गेल्याने रानडुक्करांना जंगलात काही खाद्य उपलब्ध होत नाही म्हणूनच ही रानडुक्करे महामार्ग पार करून खाडीमार्गे गावांच्या दिशेने येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नुकताच अर्नाळा येथील मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना पाच ते सहा रानडुक्कर चक्क पाण्यात पोहताना आढळून आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:25 am

Web Title: the intrusion of wild boars into the village by sea ssh 93
Next Stories
1 विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पळापळ
2 आदिवासी बांधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मोहफुलांवरील निर्बंध उठवले!
3 Corona Update : महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८५.१६ टक्क्यांवर, पण मृत्यू थांबेनात! २४ तासांत ८९१ करोना बळी!
Just Now!
X