26 September 2020

News Flash

कोयना-पाटण परिसर भुकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला

भूकंपाचे सौम्य धक्के सातारा जिल्ह्यातील कोयना, पाटण या भागांसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातही जाणवले आहेत.

साताऱ्यातील कोयनानगर जवळील घोसाटवाडी (पाटण) भाग भूकंपाच्य सौम्य धक्क्यांनी पहाटे हादरला. २.८ रिश्टर स्केलचा हा सौम्य भुकंप असल्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. पहाटे ६ वाजून ४२ मिनिटांनी परिसरात हे धक्के जाणवले. भूकंपाच्या सौम्य धक्के सातारा जिल्ह्यातील कोयना, पाटण या भागांसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातही जाणवले आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ६.४२ वाजता हा भूकंप झाला. २.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या असलेल्या या भूकंपाचे केंद्र कोयना धरणापासून ८ किमी अंतरावर  जमिनीखाली ५ किमी होते. कोयना, पोफळी, पाटण या भागात या भुकंपाचे धक्के जाणवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 10:31 am

Web Title: the koyna patan area was hit by a mild earth quake aau 85
Next Stories
1 अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला सरकारनं पुसली पानं; न्यायासाठी रस्त्यावर उतरणार – फडणवीस
2 ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली’; अमृता फडणवीसांना घणाघाती प्रत्युत्तर
3 ‘केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही’, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Just Now!
X