28 February 2021

News Flash

आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार; राष्ट्रवादीला विश्वास

खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशनिश्चितीनंतर व्यक्त केला विश्वास

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यावर त्यांनी या पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर केलं. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांनी उत्तर दिली.

राज्यातील सरकार पडेल असं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली यावर उत्तर देताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार हे केवळ पाचच वर्षे टिकणार नाही तर त्यापेक्षा अधिक काळ ते चालेल” आपल्या या उत्तराद्वारे त्यांनी खडसेंसह भाजपाच्या अनेक आमदारांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे सरकार अधिकच मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा- भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत,” असं सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:00 pm

Web Title: the mahavikas aghadi government will last for more than five years says jayant patil
Next Stories
1 खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 खडसेंचा निर्णय त्यांच्या स्वतःसाठी दुर्देवी – रावसाहेब दानवे
3 सरपंच ते महसूल मंत्री! एकनाथ खडसेंचा खडतर राजकीय प्रवास
Just Now!
X