24 November 2020

News Flash

Good News! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

आत्तापर्यंत एकूण १० लाख ६९ हजार पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही बाब समोर येत असतानाच महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १४ हजार ९७६ नवे करोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कालही करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आत्तापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७८.२६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागील चोवीस तासात ४३० जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६५ टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात ६६ लाख ९८ हजार २४ नमुन्यांपैकी १३ लाख ६६ हजार १२९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २१ लाख ३५ हजार ४९६ व्यक्ती या होम क्वारंटाइन आहेत तर २९ हजार ९४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज रोजी एकूण २ लाख ६० हजार ३६३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्यात १४ हजार ९७६ रुग्ण हे नव्याने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ६६ हजार १२९ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ४३० मृत्यूंपैकी २३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०८ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 8:35 pm

Web Title: the number of corona free patients in maharashtra is higher than the corona infected patients scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 उस्मानाबाद जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.७९ टक्क्यांवर
2 यवतमाळ जिल्हाधिकारी हटाव मोहीम तीव्र; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह १२० डॉक्टरांचा राजीनामा
3 आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी मदत द्या – फडणवीस
Just Now!
X